पिंपरी चिंचवड शहरात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावे;वंचीत बहुजन आघाडीचे महापौरांकडे निवेदन
पिंपरी (वास्तव संघर्ष) कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासंदर्भात सरकारने सरसकटपणे पास करण्याचा निर्णय घेतला. मात्र जे विद्यार्थी आयएस आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पहात आहे त्यांना पिंपरी चिंचवड शहरात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक कार्याध्यक्ष अॅड मिलिंद कांबळे यांनी महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे
कांबळे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सेवा परीक्षा वेळापत्रक जाहीर होइल . विदयार्थाना परीक्षा ढुष्टीने अभ्यास करण्यासाठी फिजीकल डिस्टनसिंगचे नियम पाळुन अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात यावे त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्यापासून वंचित राहू शकणार नाही. अभ्यासामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होईल.