बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

इंजिनियर सुनील लोंढे, उपअभियंता सुनील बेळगावकर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ .अनिल रॉय यांनी ठेकेदारांकडून स्वतःच्या अकाउंटवर घेतले पैसे-तुषार कामठे

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार पुराव्यासह निदर्शनास आणून दिल्यानंतरही आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. आयुक्तांसह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील बायोमेडिकल इंजिनियर सुनील लोंढे, उपअभियंता सुनील बेळगावकर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ .अनिल रॉय यांनी ठेकेदारांकडून स्वतःच्या अकाउंटवर पैसे घेतल्याचा सनसनाटी आरोप पुराव्यानिशी भाजप नगरसेवक तुषार कांमठे यांनी पञकार परिषदेत केला.

तसेच सुनिल लोंढे यांच्यानावावर दोन लाख पंचेचाळीस हजार सुनिल बेळगावकर यांच्या नावावर ८०,००० आणि डाॅ अनिल राॅय यांच्या नावाने दोन लाख इतका अपहार करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आपण न्यायालयात दावा दाखल करणार असून महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी आपण यापुढे कार्यरत रहाणार असल्याची माहिती भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी दिली.

कामठे पुढे बोलताना म्हणाले महापालिकेतील भ्रष्टाचार, आयुक्तांकडून सुरू असलेला वेळकाढूपणा, कारवाई करण्याऐवजी अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, पैसे घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत असतानाही त्याकडे होणारे दूर्लक्ष तसेच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गेल्या दोन-तीन वर्षांत केलेल्या प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. दरनिश्चिती करताना एक रुपयांची वस्तू दहा रुपयांपर्यंत रिंग करून घेण्यात आली आहे..

यानंतरही स्पेशिफिकेशन बदलून साहित्य घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार महापालिकेत झाला आहे. आम्ही केवळ दोनच प्रकरणे सध्या निदर्शनास आणली आहेत. यामध्ये पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून खात्यावर रक्कम घेतल्याचे निदर्शनास आणून देणे दिलेले असतानाही गेल्या १७ दिवसांपासून आम्ही कारवाईची मागणी करत असताना कोणतीही कारवाई आयुक्तांनी अद्यापपर्यंत केलेली नाही. हा अधिकाऱ्यांना वाचविण्याचा आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. या भ्रष्टाचाराचे प्रकरण मी काढले तर मला विविध नगरसेवक आमदार दबाव टाकत आहे माञ मी या दबावाला बळी न पडता जनतेसाठीच काम करणार आहे. असेही ते म्हणाले

Share this: