आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

अभिनव उपक्रम :क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन महिलांच्या मासिक धर्माच्या काळात आवश्यक असलेले सॅनिटरी पॅडचे वाटप

मानवता हिताय सोशल फाउंडेशनचा उपक्रम..

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातच बहुसंख्य महिला तरूणी या आपल्या घरापासून दूर पालिकेच्या वतीने केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रहात आहेत. महिलांच्या मासिक धर्माच्या काळात आवश्यक असलेले सॅनिटरी पॅड त्यांना सहज उपलब्ध व्हावे . तसेच हा विषय अतिशय नाजूक असून या काळात महिलांना अधिक स्वच्छता आणि काळजी घेण्याची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन सॅनिटरी पॅड वितरणाचे काम मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या वतीने हातात घेतले.

पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी येथील क्वारंटाईन सेंटर येथे जाऊन त्यांनी सॅनिटरी पॅडचे वितरण केले आहे. यावेळी मानवता हिताय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आकुर्डी येथील डि.वाय पाटील कोविड क्वारंटाईन सेंटर येथे महिला वर्गाला होणाऱ्या मासिक पाळीची गंभीर परिस्थिती निदर्शनास आल्यावर मानवता हिताय सोशल फाउंडेशन च्या मार्फत महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स व तसेच सदर ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स व ईतर कर्मचाऱ्यांना फेस मास्क, फेस शिल्ड, व पिपिई किट चे वाटप करण्यात आले आहे. यामुळे देखील शहराच्या विविध क्वारंटाईन सेंटर मधे जाऊन संस्था सॅनिटरी पॅड्स चे वाटप करणार आहे .

या अभिनव उपक्रमात सहभागी असलेले संस्थेचे अध्यक्ष – धनराजसिंग चौधरी,सचिव श्री.तानाजी साठी,खजिनदार व सल्लागार सौ.तृप्ती धनवटे रामाने, कार्याध्यक्ष मा.ब्रम्हानंद कोरपे, भरारी फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ.आशाताई इंगळे,कु. उर्वशी इंगळे, सौ.अश्विनी पवळ,श्री विशाल पवळ विशेष समन्वय व तसेच नर्स रेश्मा सोनवणे, बांधकाम कामगार सेनेचे दिपक म्हेञे, सतीश भांडेकर, वास्तव संघर्ष न्यूजचे संपादक-दिपक साबळे, डॉ. तायडे व डॉ.जोशी मॅम आणि तेथील कार्यरत असणारे पोलीस कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम पार पडला.

Share this: