बातम्या

पिंपरी चिंचवड मधील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक वसंतराव वाणी यांचे निधन

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड मधील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक वसंतराव पुंडलिक वाणी (वय 74) यांचे आज रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कोरोनाचाही संसर्ग झाला होता.

त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस व शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचेही ते माजी सदस्य होते. मध्यंतरी काही काळ पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व पुढे प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती. .

Share this: