पिंपरीत मटका जुगार अड्यावर पोलिसांचा छापा ; पाच जणांना पोलीसांनी केली अटक
पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी जायका चौक येथील मालाश्री हॉटेल समोरील बिल्डींग मध्ये , दुसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या अवैध जुगार अड्यावर पिंपरी पोलीसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली . यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे . पोलिसांनी 3 लाख 1 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
अनिता परमानंद तखतवानी ( वय 47 ) , परमानंद चतुरमल तखतवानी ( वय 48 , दोघे रा . जायका चौक जवळ , पिंपरी ) , विशाल सांताराम कांबळे ( वय 40 , रा . सुबेदार रामजी आंबेडकर नगर , डिलक्स चौक , पिंपरी ) , महेश रामचंद कुरेसा ( वय 42 , रा . पिंपरी मेन बाजारा , पिंपरी ) , सचिन जगदीश सौदे ( वय 25 , रा . विजय नगर , काळेवाडी ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी कॅम्प येथील हॉटेल जायका येथील एका इमारती मध्ये आरोपी अनिता ही महिला जायका चौकाजवळ लपून छपून जुगार अड्डा चालवत होती . याची माहिती पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांना मिळाली . त्यानुसार पिंपरी पोलिसांनी जायका चौक पिंपरी येथील मालाश्री हॉटेल समोरील बिल्डींग मध्ये , दुसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला . त्यानुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , उपायुक्त स्मिता पाटील , सहायक आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मिलिंद वाघमारे , राजेंद्र निकाळजे ( गुन्हे ) , उप निरीक्षक रमेश केंगार आणि त्यांच्या पथकाने छापा मारला. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत .