पिंपरी चिंचवड शहरात ७४९ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह;११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे .आज रविवार दि. २० सप्टेंबर रोजी ७४९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
महापालिकेने रविवारी रात्री दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार शहरातील
सक्रीय रुग्णांची संख्या ७०१७२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५९९६८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ११४२ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा सर्वात पहीला रुग्ण 10 मार्च रोजी आढळला होता. तेव्हापासून शहरातील 70हजार 172 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 59 हजार 968 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 1142जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.