बोगस सुरक्षारक्षक व ट्राफिक वॉर्डन दाखवून अधिकारी आणि ठेकेदारांची लाखो रुपयांची रिंग
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी – चिंवड महाालिकेच्या विविध मिळकतींच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक पुरविणे आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ट्राफिक वॉर्डन पुरविण्यासाठी सुरक्षा विभागाने निविदा प्रक्रिया राबविली आहे . त्यात ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करून ‘ रिंग ‘ केली आहे . त्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे , अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते किशोर तेलंग यांनी केली आहे . या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे . पालिकेच्या शहरात शेकडो इमारती आहेत .
त्या इमारतीच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक नियुक्त केले जातात .तसेच , वाहतुक पोलिसांच्या मदतीसाठी ट्राफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले जातात . या कामासाठी ठराविक ३ पुरवठादार संस्था सक्रिय आहेत . त्या ३ संस्था रिंग करून आपल्या मर्जीनुसार अटी व शर्तीचा समावेश करून घेतात . बोगस सुरक्षारक्षक व ट्राफिक वॉर्डन दाखवून पालिकेच्या लाखो रूपयांचा चुना लावत आहेत . त्यात सुरक्षा विभागाचे अधिकारीही सामील आहेत , असे तक्रारीत म्हटले आहे .
या पुरठादारांची गेल्या ३ वर्षांतील कामकाज तपासून चौकशी करावी . त्यात या कामातील गैरव्यवहार उघड होईल , असे तेलंग यांनी तक्रारीत म्हटले आहे . पालिकेच्या तिजोरीवर डल्ला टाकणाऱ्यांवर या पुरवठादारांची चौकशी करावी , अशी मागणी त्यांनी केली आहे .