क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अवैध हातभट्टी विक्री करणाऱ्या अड्यावर पोलिसांचा छापा;८,१३.५५० रुपयांचा माल पोलिसांनी केला जप्त

चाकण (वास्तव संघर्ष) :चाकण परिसरातील निघोजे येथील इंद्रायणी नदीच्या काठी बेकायदा विनापरवाना, अवैध हातभट्टी विक्री करणाऱ्या अड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. आरोपींकडून कच्चे रसायन रोख रक्कम , मोबाईल , दोन चारचाकी वाहने , असा एकुण ८,१३.५५० रुपयांचा माल जप्त करण्यात आले आहे.

सुनिल जगन्नाथ शिरसाट पोलीस हवालदार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फकिर हसन पटेल ( वय २६ रा. पदमावती झोपडपटटी , कात्रज , पुणे ), दिपक मधुकर करे (वय २३ वर्षे रा. रूम नंबर ५०८ निराधार नगर झुलेलाल , कॉम्लेक्स मागे पिंपरी , पुणे . सध्या रा रूम नंबर ५४८ ओम साई बिल्डींग शांती कॉलनी ची काळेवाडी पुणे), नागेश सुर्यवंशी( वय २४ वर्ष रा.भाटनगर समोर निराधारनगर झोपडपटटी पिंपरी )असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास चाकण परिसरातील निघोजे येथील इंद्रायणी नदीच्या काठी तीनही आरोपी यांनी त्यांच्याकडे बेकायदा विनापरवाना त्याचे कब्जात गावठी हातभट्टीची तयार दारु तसेच दारू तयार करण्याचे कच्चे रसायन रोख रक्कम , मोबाईल , दोन चारचाकी वाहने , असा एकुण ८,१३.५५० / – रुपये रु कि.चा प्रोव्हीबीशन माल अनाधिकारपणे , बेकाशीररित्या अवैधरित्या , दारु गाळण्याचे साहित्य बाळगुन , दारुची हातभट्टी लावुन हातभट्टी पासुन तयार झालेली दारु प्लास्टीक केन्डमध्ये भरुन जवळ बाळगुन विक्री करीत असताना मिळुन आले. त्यानुसार त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Share this: