क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मास्क न वापरणा-या आरोपीने घातली थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी ;चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

चिंचवड (वास्तव संघर्ष) चिंचवडगाव परिसरातील अहिंसा चौक ( एल्पो चौक ) परिसरात मास्क न लावलेल्या वाहन चालकांवर, काळ्या काचेची वाहने , रॉग साईडने येणारी वाहने अशा लोकांवर वाहतूक पोलिस कारवाई करत होते. मात्र मास्क न घातलेल्या आरोपी ने कार्यवाई होईल या भितीने थेट वाहतूक पोलीसाच्या अंगावरच गाडी घालून फरफटत त्यांना एक किलोमिटर नेले पुढील चालकाने गाडी थांबविल्याने त्या पोलिसाचा प्राण वाचला . मात्र फरफटत नेल्यामुळे त्याचा पाय फ्रेंक्चर झाला आहे . ही घटना चिंचवडगाव येथे आज ( गुरुवार , दि . 5 ) सायंकाळी घडली .

आबासाहेब विजयकुमार सावंत चिंचवड वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

युवराज किसन हनुवते ( वय 49 रा. घर नं 440 फ्रिडम पार्क विशालनगर पिंपळे निलख ) असे माथेफिरू वाहन चालकाचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आबासाहेब सावंत हे गुरुवारी सायंकाळी चिंचवडगाव परिसरातील अहिंसा चौक ( एल्पो चौक ) परिसरात मास्क न लावलेल्या वाहन चालकांवर, काळ्या काचेची वाहने , रॉग साईडने येणारी वाहने , जुन्या पेंडींग पावत्या पेड करुन घेणे , विदाऊट सिटबेल्ट , लेनकटींग , इत्यादी कारवाई करीत होते . त्यावेळी आरोपी युवराज हनुवते हा त्याच्या कारमधून ( एमएच 01 / वाय 8837 ) तिथे आला . त्याने तोंडाच्या खाली मास्क घेतल्याने पोलिसांनी त्यास कार बाजूला घेण्यास सांगितले.

कार बाजूला घेतो असे म्हणून तो पळून जाण्याचा प्रयत्न करून लागला . त्यावेळी कारच्या समोर पोलीस कर्मचारी सावंत हे होते . तो कार पुढे घेत असताना सावंत यांचा पाय कारच्या बोनेटमध्ये अडकला . त्याने आरोपी युवराज याला सांगूनही त्याने कार पुढे घेतली . जीव वाचविण्यासाठी सावंत हे कारच्या बोनेटवर बसले . कारच्या वरील बाजूस असलेल्या ऍन्टीनाला धरले . मात्र माथेफिरू कार चालकाने त्याही स्थितीत कार पुढे दामटली . रस्त्यावरील दुचाकी वाहन चालकांनी तसेच वाहतूक पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला .

तरीही कार चालकाने कार थांबविली नाही . त्यानंतर एक दुचाकी चालकाने कारच्या पुढे जाऊन पुढच्या कार चालकाला गाडी थांबविण्याची विनंती केली . त्यानुसार पुढील वाहन चालकाने कार थांबविल्यानंतर माथेफिरू वाहन चालकाने कार थांबविली . दरम्यान यामध्ये फिर्यादी आबासाहेब सावंत यांचा एक पाय वाहनाच्या खाली आल्याने पायास गंभीर दुखापत होवुन पायास फंक्चर करण्यात आले . पोलिसांनी माथेफिरू कार चालकाला अटक केली आहे . खुनाच्या प्रयत्नाचा तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा वाहन चालकावर दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत .

Share this: