बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी केशव घोळवे यांची बिनविरोध निवड

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महापानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नगरसेविका निकिता कदम यांनी शुक्रवारी शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध करण्यात आली . पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी झाली . पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार पीठासन अधिकारी होते . निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे सांगून खेमणार यांनी अर्ज माघारी साठी पंधरा मिनिटांचा कालावधी दिला .

भाजप उमेदवार घोळवे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना माघार घेण्याबाबत विनंती केली.अर्ज माघार घेण्याच्या मुदतीस चार मिनिटे बाकी असताना कदम यांनी माघार घेतली . त्यांनी माघार घेत असल्याबाबतचा अर्ज पीठासन अधिकाऱ्याकडे सादर केला .

Share this: