बातम्या

नांदेड विद्यापिठाने विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालवलाय का? लेखी परीक्षेच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमरण उपोषणाचा इशारा

नांदेड (प्रतिनिधि)कोरोना काळात ज्या प्रमाणे इतर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या त्या पध्दतीने कॅरीऑन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुध्दा ऑनलाईन घेण्यात याव्यात अन्यथा ९ नोव्हेंबर पासुन आमरण उपोषण करण्याचा ईशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सौरव जाधव यांनी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरु यांना पाठवलेल्या ऑनलाईन पत्राद्वारे दिला आहे.

कुलगुरु यांना पाठविलेल्या पत्रात सौरव जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापिठानी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालवलाय का ? असा सवाल या वेळी उपस्थीत केला जातोय.लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करुन कोरोना संकटात जीव मुठीत घेऊन परीक्षा देणे कितपत योग्य आहे? जर परीक्षा केंद्रावर लेखी पध्दतीने घेण्यात आल्या तर बाहेरुन येणार्‍या विद्यार्थ्यांना राहण्याचे व खाण्याचे हाल होतील .

जर परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास याची जबाबदारी विद्यापीठ घेणार का? अश्या अनेक प्रश्नांवरुन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सौरव जाधव यांनी लक्ष वेधले आहे. विद्यापिठानी अत्तापर्यंत ज्याप्रकारे विद्यार्थी हीताचे निर्णय घेतले आहेत त्याचप्रकारे विद्यार्थ्यांचा हिताचा आरोग्याचा विचार करावा अशी विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ने केली आहे,अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून ९ नोव्हेंबर पासुन आमरण उपोषण व आंदोलन छेडण्यांचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.

दरम्यान. परगावातून परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे कुठलेही नियोजन व्यवस्था स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने न करता त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत तसे परिपञकच विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहे.

Share this: