नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या; अन्यथा आयुक्तांना गढूळ पाणी पाजू – राष्ट्रवादी कांग्रेस सफाई सेलचा ईशारा
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागात कमी दाबाने व गढूळ पाणी येत असून शहरवासीयांचे जीवन आरोग्य धोक्यात आले आहे.पाण्याला अमृत दर्जा मानले जाते. मात्र शहराच्या अनेक भागात अति गडूळ व पिवळसर पाणी येऊन त्यामध्ये गाळ देखील साचत आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यामुळे पोट दुखी, जुलाब, उलट्या ,असे अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ व वेळेवर पाणी पुरवठा करण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल शहराध्यक्ष चंद्रकांत बोचकुरे यांनी केली आहे.
बोचकुरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आठ महिन्यांपासून कोरोना हा संसर्गजन्य आजार आल्यापासून वाय सी एम हे हॉस्पिटल हे कोरोना रुग्णांकरिता राखीव केले आहे.गरिब गरजू नागरिकांना विनाशुल्क उपचार घेता येत नाही याचाही विचार करावा. व अनेक भागांमध्ये अवेळी पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेली झोपडपट्टी गांधीनगर प्रभाग क्रमांक 9 गांधीनगर झोपडपट्टीमध्ये रात्री 2:30 वाजता पाणी येते व 3:30 पर्यंत पाणी बंद केले जाते.
अशाने गांधीनगरमधील नागरिकांचे हाल होत आहेत. वेळेवर पाणी मिळत नाही जे काही पाणी मिळते ते पण गढूळ व पाण्यामध्ये गाळ असलेलेच पाणी मिळते. पिण्यायोग्य पाणी नागरिकांना मिळत नाही यावर लवकरात लवकर विचार करून वेळेवर दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करावा सकाळी सहा ते नऊ व संध्याकाळी पाच ते सात या वेळेत पाणी पुरवठा करावा व स्वच्छ पाणी मिळावे याची नोंद घ्यावी अन्यथा नागरिकांना मिळणारे पाणी आयुक्तांना आणि वरील विषयास संबंधित अधिकारी यांना आम्ही पितो तेच पाणी पाजून आंदोलन करण्यात येईल असे देखील बोचकुरे यांनी निवेदनात म्हटले आहे.