बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

प्रल्हाद कांबळे मारहाण प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्याचे लेखी आदेश :पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी(वास्तव संघर्ष) :कष्टकरी कामगार पंचायतचे नेते प्रल्हाद कांबळे व त्यांची पत्नी रुक्मिणी कांबळे यांना मारहाण करून प्रल्हाद कांबळे यांच्या विरोधात ३५३ व ३५४ कलमा अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली ,या प्रकरणी पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्यामुळे आणि 353 चा दुरउपयोग होत असले बाबत पिंपरी-चिंचवड शहरातील फुले-शाहू-आंबेडकर वादी पक्ष संघटना, कष्टकरी संघटना आणि सर्व पक्षांच्या वतीने या घटनेचा निषेध १ मे २०२१ रोजी पोलीस आयुक्त कार्यालय वर सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता .

यानंतर आज दिनांक 30 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली या वेळी प्रल्हाद कांबळे व त्यांच्या पत्नी यांना मारहाणप्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे तसेच ज्वाईन कमिश्नर रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्री.सुधीर हिरेमठ यांनी या प्रकरणाची चौकशी करू असे आश्वासन दिल्यामुळे १ मे रोजी निघणारा सर्वपक्षीय मोर्चा रद्द करण्यात आला आल्याचे कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी वास्तव संघर्ष बोलताना सांगितले,

यावेळी संतोष निसर्गंध म्हणाले, ३५३ या कलमाचा सरकारी बाबु कडून दुरउपयोग होत असून हे कलम रद्द करण्यात यावे यामुळे चळवळीवर दडपण येत आहे, आज झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत.

Share this: