बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून सफाई कामगार, लहान मुलांना अनोखी दिवाळी भेट ;दिवाळी फराळासह केले मास्क वाटप

पिंपरी (वास्तव संघर्ष) राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने व युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी ,चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघात सफाई कामगार, लहान मुले तसेच घरकाम करणारे महिला यांना दिवाळी फराळ, रंगवलेले दिवे, आकाशकंदील, मास्क इ . साहित्य वाटप करून हा कार्यक्रम ( एक दिवा उद्याच्या उमेदीचा ) ह्या उपक्रमाअंतर्गत पणत्या रंगवून त्यावर सजावट करून त्या बाजारात विक्री करून येणारा जो निधी आहे त्यातून घेण्याचा विशेष प्रयत्न केला.

यासाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटिल , योगेशजी बहल( मा. महापौर) यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशांत शितोळे( मा. स्थायी समिती अध्यक्ष),फजल भाई शेख ( मा. सभापती शिक्षण मंडळ) यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला.ऋतुजा बिराजदार ( चिंचवड विधानसभा युवती आध्यक्षा), नेहा पडवळ ( उपाध्यक्षा पिं.चिं शहर), गीता मोरे( पिंपरी विधानसभा युवती अध्यक्षा) सायली निकम, सारिका ढमे यांच्या पुढाकारने व हीना अत्तार , स्नेहल लायगुडे, शलाका बनकर, अश्विनी पवळ , सोनल वाळुंज, तृप्ती इ . च्या सहभागातून कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कविता खराडे, गंगाताई ढेंडे,आशाताई सुर्यवंशी, पोपट पडवळ,अशोक मगर ,आबासाहेब गवळी , सुजाता विधाते , सविता मिटगुले , प्रेमा शेट्टी ,रंजना रणदिवे, माऊली मोरे,साहुल भाई, अकबर भाई,राधिका ताई, धनाजी तांबे आदी उपस्थित होते.

Share this: