नाहीतर याचे परीणाम वाईट होतील ‘असे म्हणुन आरोपींने पोलीसांच्या अंगावरच हात उगारला;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरीतील निराधार नगर झोपडपट्टी येथे गावठी हातभटटीच्या अवैध धंद्यावर पोलीसांनी छापा टाकला.पोलिसांनी धंद्यावर छापा टाकल्याचा राग येऊन आरोपीने तुमचा मला पकडण्याचा काय संबंध ब – या बोलाने मला सोडा नाहीतर याचे परीणाम वाईट होतील . असे म्हणुन आरोपी पोलीसांच्या अंगावर धावून आला. ही घटना रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पिंपरीतील निराधारनगर येथे घडली.
पोलीस अंमलदार विष्णु गौतम भारती यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विष्णु सुभाष सुळ (वय ३२ वर्षे , रा.काळेवाडी नढे कॉम्पलेक्स ३ रा मजला नढेनगर पिंपरी) असे गुन्हा दाखल व अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील निराधार नगर झोपडपट्टी येथे रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी विष्णु सुळ याने आपल्या जवळ असलेली गावठी हातभटटी ३५ लिटर तयार दारु असा एकूण २५०० रुपये किमतीचा प्रोव्ही चा माल जवळ बाळगुन त्याची विक्री करत असताना मिळुन आला. पोलीसांनी त्याला जागीच पकडले असता व आरोपींस पोलीसांनी ओळख सांगितली असता आरोपीने पोलीसांना ओरडुन म्हणाला ‘मी एकटाच दारुचा धंदा करतो काय . तुमचा मला पकडण्याचा काय संबंध ब – या बोलाने मला सोडा नाहीतर याचे परीणाम वाईट होतील . असे म्हणुन आरोपी विष्णु सुळ याने हात उगारुन मारण्यासाठी अंगावर धावून आला व पोलीसांशी झटापट करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.