जेव्हा तिघांविरुद्ध एकाची ताकद असा विषय येतो तेव्हा असे निकाल येतातच-चंद्रकांत पाटील
पुणे (वास्तव संघर्ष) :जेव्हा तिघांविरुद्ध एकाची ताकद असते तेव्हा तेव्हा असे निकाल येतातच पदवीधर निवडणुकांच्या निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर आता भाजप नेत्या कडून यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे . चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या जागेचा विषय क्लियर कट होता असे सांगत पराभव मान्य केला आहे .
तसेच चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले , गेल्या निवडणुकीत अपक्ष असलेल्या अरुण लाड यांनी 38 हजार मते मते खाल्ली होती . यावेळी तसा उमेदवार नव्हता . त्याच्या आधीच्या निवडणुकीत सुद्धा दहा , दहा हजार मते खानारे चार उमेदवार उभे होते . जेव्हा तिघांविरुद्ध एकाची ताकद असा विषय येतो तेव्हा असे निकाल येतातच . भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तर आपली दुकान बंद होईल या भीतीने ते एकत्र लढले आणि निवडून आले . हिंमत असेल तर त्यांनी एकट एकटं लढावे असे आवाहन ही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले . यापूर्वी दोन वेळा भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत . त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती .