क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शारिरीक संबंधासाठी वकिलाने केली हद्दपार ; वाचून तुम्हाला बसेल धक्का

पिंपरी(वास्तव संघर्ष) : वकिलाचा पेशा हा गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे महत्त्वाचे काम करणारा पेक्षा समजला जातो मात्र एका वकिलाने आपल्या या पेशालाच काळीमा फासण्याचे काम केले आहे. एका महिलेला गुंगीचे औषध पाजून वारंवार बलात्कार केला आहे. ही घटना जून 2018 ते  फेब्रुवारी 2022 रोजी दरम्यान पिंपरी, शिवाजीनगर, वडगावशेरी, खराडी पुणे येथे घडली आहे.

याबाबत पिडीत फिर्यादी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार ॲड. अजय अप्पाराव साताळकर, महिला आरोपी , महिला आरोपी यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय हे पेशाने वकिल आहेत त्याने फिर्यादी महीलेसोबत ओळख वाढवुन मैत्रीकरुन प्रेमाची मागणी केली. त्यास फिर्यादीने महिलेने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपी अजय याने फिर्यादी महिलेला मला एस. आर.ए. ( पुनर्वसन प्रकल्पाचे ) मोठेकाम  मिळाले आहे. असे सांगुन पक्षकारांसोबत कामाबाबत बोलणी करुन काम समजुन घेण्यासाठी बोलावुन घेवुन पिंपरी येथे हॉटेलमध्ये पक्षकार थांबले असल्याचे सांगुन फिर्यादी महिलेला तेथे घेवुन जावुन पाण्यात गुंगीकारक औषध दिले. नंतर फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने शारिरीक संबध ठेवले तसेच फिर्यादी महिलेचे विवस्र फोटो व व्हिडीओ काढले आणि मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगुन सदर बाब कोणास न सांगण्याबाबत धमकी दिली.

फिर्यादी महिलेला पुन्हा भेटण्यासाठी फोन वरुन संपर्क केला त्यास फिर्यादीने नकार दिला मात्र फिर्यादीचे विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देवुन वेळोवेळी विविध ठिकाणी बोलावुन जबरदस्तीने शारिरीक संबध ठेवले. त्यानंतर दोन आरोपी महिलांनी फिर्यादीस मारहाण, शिवीगाळ, व धमकी देवुन माफी मागण्यास सांगुन त्याचा व्हिडीओ बनवुन फिर्यादीचे विवस्त्र अवस्थेतील फोटो व व्हिडीओ फिर्यादीचे बहिणीस मोबाईलवर पाठवुन तसेच फिर्यादीचे पतीस दाखवुन फिर्यादीस मानसिक , सामाजिक, शारिरीक त्रास दिला आहे. आरोपी अजून अटक नसून पोलीस निरीक्षक गुन्हे  मिसाळ अधिक तपास करीत आहेत.

Share this: