क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील ‘या’ टोळीवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी दोन टोळ्यावर मोक्या अंतर्गत कारवाई केली आहे. एका टोळीवर खून,खूनाचा प्रयत्न,दरोडा, खंडणी, शस्त्र बाळगणे असे 13 गुन्हे दाखल आहेत. तर दुसऱ्या टोळीवर एकूण 25 गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख अमित भुरेलाल सौदे ( वय 25 , रा . रिव्हर रोड , पिंपरी ) , विकी भुरेलाल सौदे ( वय 30 ) , गुलशनकुमार ऊर्फ गुलाबचंद ऊर्फ बल्ली निधीचरण राऊत ( वय 28, रा. काळेवाडी )अक्षय सुभाष बेनवाल ( वय 25, रा. रिव्हर रोड , पिंपरी ), अजय ऊर्फ सोनु मोहन बिडलान ( वय 24 , रा . सुभाषनगर, पिंपरी )आणि गोपी सुखपाल घलोत ( वय 27 , रा . रिव्हर रोड, पिंपरी) अशी सौदे टोळीतील आरोपी यांची नावे आहेत.

टोळी प्रमुख गणेश हनुमंत मोटे ( वय 23 ) अश्विन आनंदराव चव्हाण ( वय 21 ) महेश तुकाराम माने(वय – 23 ),गणेश बाजीराव ढमाले ( वय 34 ) ( सर्व रा . सांगवी ) , अक्षय गणेश केंगले ( वय 21 , रा . पिंपळे गुरव ) , प्रथमेश संदीप लोंढे ( वय 24 , बारामती , पुणे ) , मुजम्मील इस्माईल अत्तार ( वय 19 , दिघी ) , गणेश ऊर्फ मोनु सुनिल संकपाळ ( वय 21 , निगडी ) , अभिजीत बाजीराव ढमाले ( रा . जुनी सांगवी ) , निखील ऊर्फ डोक्या अशोक गाडुते ( रा . जुनी सांगवी ) , राजन ऊर्फ बबलु रवी ( रा . सांगवी ), निलेश मुरलीधर इयर ( रा . सांगवी ) व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे .

Share this: