पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग ;आगीत पाच कामगारांचा मृत्यू
पुणे (वास्तव संघर्ष) – कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करणाऱ्या पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी (दि 21)रोजी दुपारच्या सुमारास आग लागली आहे . या आगीत दुर्दैवाने 5 कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून 3 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे . आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही .
मिळालेल्या माहितीनुसार , पुण्यातील मांजरी येथे सीरम इन्स्टिट्यूटच्या आवारातील नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमारास आग लागली असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार घटनास्थळी आगीचे बंब पाठविण्यात आले . पोलीस फौजफाटा आणि अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी पोहोचले . सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कालव्यालगत हॅलीपॅड आहे . तेथील नवीन इमारतीला आग लागली असून आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. आग आटोक्यात आली आहे. या आगीत दुर्दैवाने 5 कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.