बातम्या

खरंच सोमवारपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडला लाॅकडाऊन होणार का?

पुणे(वास्तव संघर्ष) : पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाउन होणार असल्याचा व्हिडिओ शनिवारी ( ता . 20 फेब्रुवारी ) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे .पण खरंच सोमवारपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडला लाॅकडाऊन होणार का? याचे उत्तर खुद्द पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख म्हणाले, ज्या भागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येईल . तो परिसर पूर्वीप्रमाणेच म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे . ठराविक कालावधीनंतर भाजी मंडई , दुकानदार अशा लोकांच्या नियमित कोरोना चाचण्या करण्यात याव्यात , असे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांमध्ये म्हटलेले आहे .

सोशल मीडियावर आज व्हायरला झालेला व्हिडिओ जुना आहे . त्यात जिल्ह्यात लॉकडाउन होणार असल्याचे म्हटलेले आहे . पण , तो जुना व्हिडीओ असून लॉकडाऊन होणार ही अफवा आहे . अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये .सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ग्रूपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कृपया, कोणीही अफवा पसरवू नये, आणि अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे .असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.

Share this: