नव-याने व्हाॅटसपवर डीपी ठेवला नाही म्हणून बायकोची पुणे पोलिसांत तक्रार
पुणे (वास्तव संघर्ष) : पुणे तिथे काय उणे असे बोलले जाते त्यातल्या त्यात ही म्हण प्रत्यक्षात आणण्यासाठी पुणेकर देखील मागे पडताना दिसत नाहीत.याचाच प्रत्यय पुणे पोलिसांना आला आहे ‘नवरा व्हाॅटसपवर माझा डीपी ठेवत नाही’ अशी तक्रार पत्नीने पोलिसांना केली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवरा – बायको हे दोघेही उच्चशिक्षित आहेत . बायकोला वडील नसल्यामुळे नवरा तिच्या आईची आणि बहिणीची काळजी घेत असतो .असे असले तरी त्यांच्यात वाद होते कारण नवरा त्याच्या व्हाॅटसपवर तिचा डीपी ठेवत नव्हता . अखेर भरोसा सेलमध्ये दोघेजण आले , तिथल्या पोलिसांनी त्यांची समजूत घातली आणि हा वाद मिटला . पण अशीच भांडण सध्या अनेक ठिकाणी होताना दिसतात .
याच मुद्द्यावर अनेक नवरा बायकोंनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.यावर सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काहींचे मत हे बायकोचा फोटो सोशलमिडीयावर डीपी ठेवण्यात हरकत नाही तर काहीजण म्हणतात याचा गैरवापर होऊ शकतो असे मत व्यक्त करतात. सोशलमिडीया हे दुधारी शस्त्र आहे. काहीवेळा हे उपयोगी येते तर काही वेळा उलटतं सुद्धा . पण आता हा सोशल मीडिया नवरा बायको मधल्या दुराव्याचे ही कारण ठरवू शकतो हे देखील समोर येत आहे .