बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

या तारखेला होणार पिंपरी चिंचवड पालिकेतील उपमहापौर पदाची निवडणूक

पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेची उपमहापौर पद रिक्त झाल्यानंतर या पदाची निवडणूक कधी होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. मात्र उपमहापौरपदासाठीची निवडणूक येत्या 23 मार्च 2021 होणार आहे .अशी माहिती अतिरिक्त आयुक्त , नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली आहे . त्यासाठी 19 मार्चला दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज भरता येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

माजी उपमहापौर केशव घोळवे यांना अवघ्या चार महिन्यात उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला.घोळवे यांनी 5 मार्च रोजी महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा दिला होता . त्यांच्या राजीनाम्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले . विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे . त्यानुसार 19 मार्च रोजी तीन ते पाच या वेळेत निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहेत . 23 मार्च रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे .

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता विशेष सभा होणार आहे . पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत . महापालिकेत भाजपचे बहुमत आहे . त्यामुळे भाजपचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे .

आगामी निवडणुकीला जेमतेम दहा महिन्यांचा कालावधी आहे . त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उपमहापौरपदी कोणाला संधी दिले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे . दरम्यान स्थायी समितीमध्ये सभापती पदाचे स्थान न दिल्या कारणावरून नाराज रवी लांडगे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रवी लांडगे यांचे उपमहापौरपदासाठी नाव निश्चित होऊ शकते .

Share this: