क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

विजय सुर्वे खुन प्रकरणातील एका आरोपीला पिंपरी पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख विजय सर्जेराव सुर्वे ( वय 40 ) यांच्या खून प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे . तर एक आरोपी फरार झाला आहे. मुळशी खुर्द येथील मानगाव ते पुणे या रस्त्यावर मयत विजय सुर्वे यांचा मृतदेह आढळला होता. त्यानुसार पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली. यामध्ये पिंपरी पोलीसांना यश आले. त्यानुसार रविवारी रात्री अकराच्या सुमारास आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

हर्षल अशोककुमार राठोड ( वय 29 , रा . निगडी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . तर आरोपी महमद (पुर्णनाव पत्ता माहित) हा फरार झाला आहे.

अशोक नामदेव कांबळे ( वय 28 , रा . मुळशी खुर्द , ता . मुळशी ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 10 मार्च रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना सुर्वे यांचा मृतदेह दिसला . मात्र मृतदेह पालथा असल्याने नागरिकांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले . कोणीतरी दारू पिऊन पडला असावा असा नागरिकांचा अंदाज होता . पण मृतदेहाजवळ रक्त सांडले असल्याने नागरिकांना संशय आला .याबाबत तत्काळ नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली .

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली . आरोपींनी सुर्वे यांच्या तोंडावर , मानेवर व डोक्यात टणक बोथट हत्याराने मारून त्यांचा खून केला होता . पुरावा नष्ट करण्यासाठी सुर्वे यांचा मृतदेह पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी खुर्द गावाजवळ टाकला होता .या गुन्ह्याचा तपास करत पिंपरी पोलिसांनी आरोपी हर्षल अशोककुमार राठोड याला अटक केली असून आरोपी महमद हा त्यांचा साथीदार मात्र फरार झाला आहे . अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत .

Share this: