पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची बदली झाली का ?
पिंपरी(वास्तव संघर्ष):पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांची गेल्याच महिन्यात पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली होती .त्यानंतर शहरांचे नवनियुक्त आयुक्त म्हणून राजेश पाटील यांनी 15 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता .आज बरोबर 15 मार्च रोजी पाटील यांच्या नियुक्तीस महिना झाला आहे.
मात्र ‘सरकारी काम सहा महिने थांब ‘असा प्रत्यय राजेश पाटील यांना देखील आला आहे. पिंपरीतील नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांची बदली झाली आहे का? आणि पुन्हा त्यांच्या जागी श्रावण हर्डीकर हे रूजू झाले आहेत का? अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे मोरवाडीत शासनाने नवनियुक्त आयुक्तांना राहण्यास दिलेल्या बंगल्यावर देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांचेच नाव आहे. मात्र नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांच्या त्या बंगल्यावरील पाटीवरचे नावच गायब झाले आहे .त्या जागी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नेमप्लेट असलेली पाटी जैसे थे असलेली दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची सभ्रवस्था :
पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाच्या शेजारी असलेल्या आयुक्त बंगल्याशेजारील रस्त्यावर अनेक नागरिकांची वर्दळ असते. येणाऱ्या जाणाऱ्या अनेक नागरिकांच्या निर्दशनास सदरील बंगल्यावरील पाटी येते. तसेच सामाजिक कार्यकर्ते,राजकारणी हे पालिका बंद असल्याने सुट्टीच्या दिवशी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आयुक्त बंगल्यावर भेटायला येत असतात. मात्र बंगल्यावरील नवनियुक्त आयुक्तांचे नाव नसल्याने त्यांच्यामध्ये सभ्रवस्था निर्माण झाली आहे. नेमके पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त कोण? श्रावण हर्डीकर की राजेश पाटील असा प्रश्न त्यांना पडला आहे.
दरम्यान, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या राजवटीत अधिका-यांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे . त्याची जबाबदारी आयुक्तांचीच होती . त्यांचा प्रशासनावर वचक आणि नियंत्रण नाही . महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक निष्क्रिय आयुक्त हर्डीकर असल्याचा हल्लाबोल शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहरातील विविध सामाजिक राजकीय संस्था सातत्याने करत होत्या. इतके वादग्रस्त आयुक्त असताना देखील भ्रष्ट अधिकार-यांवर हर्डीकर यांची भुरळ असल्याची या प्रकरणावरून पाहायला मिळत आहे.