बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांचे पाच हजार रुपये देण्यास सुरुवात

पिंपरी (वास्तव संघर्ष) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत च-होली , रावेत व बो-हाडेवाडी येथील प्रकल्पातील सदनिकांची ऑनलाईन संगणकीय सोडत दि .27-2-2021 रोजी काढण्यात आली होती. या सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी मोहिम सोमवार दि 8 मार्च 2021 पासून सुरु करण्यात आली होती. निवड अथवा प्रतिक्षा यादीत नाव नसलेल्या अर्जदारांचे डिमांड ड्राफ्टचे पाच हजार रुपये परत देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. अर्जदारांच्या थेट बँक खात्यावर पाच हजार रुपये ट्रान्सफर केले जात आहेत.

38 हजार जणांचे पैसे देण्याची कार्यवाही सुरू असून आजपर्यंत 21 हजार अर्जदारांचे प्रत्येकी पाच हजार ट्रान्सफर केले आहेत. याबाबतची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेला 72 हजार 326 घरकुलांचे उद्दीष्ट दिले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाच्या वतीने महापालिका क्षेत्रात आवास योजना राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या योजनेअंतर्गत च-होली , रावेत व बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी 3 हजार 664 सदनिका बांधण्याचे काम सुरू आहे.

Share this: