क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अनैतिक संबंधातून पतीने केली पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण ;आरोपी पती घटनास्थळावरून पसार

आळंदी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील आळंदी येथील एका घराच्या टेरेसवर पती आणि पत्नीमध्ये वाद चालू होता.पतीचे बाहेर एका बाईशी अनैतिक संबंध होते या संबंधाला पत्नीचा विरोध होता. याचाच राग मनात धरून पतीने पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.24) रोजी माझगाव जय भवानीनगर चिंबळी येथे घडली आहे.

याबाबत अंजना विठठल राउत (वय ३८ वर्षे , रा.माझगाव जय भवानीनगर , चिंबळी , ता खेड , जि.पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विठठल भागवत राउत (वय ४५ वर्षे , रा . माझगाव जय भवानीनगर , चिंबळी , ता.खेड. जि.पुणे) या आरोपी विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फीर्यादी पत्नी ही राहत्या घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालत असताना तीचा पती आरोपी विठठल राउत याने ” माझे दुस-या बाईशी संबंध आहेत, तिला मी घरी आणणार आहे” असे म्हणत असताना फिर्यादी पत्नीने त्याला विरोध करत म्हणाल्या की आत्ता आपले मुलींची लग्ने झाली आहेत . मुलगाही लग्नाला आलेला आहे.तुम्हाला हे शोबत नाही असे समजावून सांगत असतानाच आरोपी पतीने राग मनात धरून फीर्यादीस शिवीगाळ करून ‘मी त्या बाईला घरी आणणारच आहे असे म्हणुन लोखंडी रॉडने फीर्यादी पत्नीच्या पाठीमागे उजवे खांदयावर , पाठीवर , कमरेवर , मारहाण करत डोक्यात उजव्या कानाच्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली.

रक्त येवू लागल्याने फीर्यादी मोठयाने ओरडून आरोपी पतीचा मार वाचवण्यासाठी हात पुढे केला असता आरोपीने डावे हाताचे मनगटावर कोपराजवळ मारून फॅक्चर करून तसे जिन्याकडे खाली जाण्यासाठी पळत असताना फीर्यादी पत्नीच्या केसाला पकडून ढकलुन देवून शिवीगाळ करत तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. गुन्हा दाखल होताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. अधिक तपास आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लोहेकर करीत आहेत.

Share this: