क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण ; भोसरी पोलीस ठाण्यात ॲस्टोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

दापोडी (वास्तव संघर्ष) : मुस्लिम समाजातील मुलीशी प्रेमविवाह केला म्हणुन तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे. वडीलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी माहेरी गेलेल्या मुलीच्या पतीला ही जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.13) मार्च रोजी बापू काटे चाळ सार्वजनिक रोडवर दापोडी येथे घडली. त्यानुसार आरोपींवर अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी शंकर पवार ( वय 36 , रा . पिंपळे गुरव ) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिरोज ऊर्फ दिलावर शेख ( वय 41 ) , बशीरा फिरोज शेख ( वय 38 ) , जुबेदा सिराज शेख ( वय 60 ) , रजिया सलीम शेख ( वय 48 ) , फर्जना शाहिद मुलतानी ( वय 35 ) , जुबेदा शाहिद मुलतानी ( वय 22 ) , चांद सलीम शेख ( वय 21 ) , अंजुम सलीम शेख ( वय 24 ) , यास्मिन हुसेन सय्यद ( वय 50 , सर्व रा . दापोडी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी सनी पवार आणि त्यांची पत्नी अंजली उर्फ शमा नासिर शेख यांनी आंतरधर्मीय विवाह केला आहे . 13 मार्च 2021 रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या पत्नी अंजली उर्फ शमा या त्यांच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दापोडी येथे गेल्या होत्या . त्यावेळी आरोपी नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली . याबाबत फिर्यादी सनी पवार यांच्या पत्नीने त्यांना फोन करून माहिती दिली . त्यामुळे फिर्यादी पत्नीला वाचवण्यासाठी गेले असता तेव्हा आरोपींनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत .

Share this: