‘माझ्या पतीसोबत लग्न का केले ‘असा जाब विचारणा-या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतुन खुन करण्याचा प्रयत्न ;निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
निगडी (वास्तव संघर्ष) :माझ्या पतीसोबत लग्न का केले असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या विवाहीत महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी चारच्या सुमारास निगडी घडली आहे.
याबाबत पिडीत 33 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अलीशा शेख (रा . सिध्दीविनायक हौसिंग सोसायटी , | रुमनं . ३१४ , ओटास्किम , निगडी )व तिची बहीण नाव पत्ता माहीत नाही असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी महिला या आरोपी अलीशा शेख हिस माझ्या पतीसोबत लग्न का केले असे विचारण्यासाठी स्वतःच स्वतःचे अंगावर पेट्रोल ओतुन घेवुन हातामध्ये माचीस घेवुन आरोपी यांना धमकाविण्यासाठी गेली असता तेथे आरोपी अलीशा शेख व तिच्या बहीणीने फिर्यादी महिले सोबत झटापट करुन तिच्या हातची खाली पडलेली माचीस उचलुन तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी अलीशा शेख हिने माचीस पेटविली असता फिर्यादी महिलेच्या अंगावर पेट्रोल असल्याने भडका होवुन त्यामध्ये ती जळुन जबर जखमी झाली. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.