क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अवैध गावठी दारुच्या भट्टीवर पोलिसांचा छापा ; दारुची भट्टी चालवणा-या दोन महिलांना पोलीसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत अवैद्यरित्या चालु असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर पोलिसांनी छापा टाकून दारुची भट्टी चालवणा – या दोन महिलांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे .

मर्जिना हमराज राजपुत (वय ४० वर्षे रा.शिरगाव पुणे ) पुनम अकबर नानावत (वय ४३ वर्षे रा.शिरगाव पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी महिलेची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैद्यरित्या चालु असलेल्या गावठी दारुचे भट्टीवर गुरूवारी रात्री शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत पेट्रोलिंग करित असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार शिरगाव पोलीस चौकीचे अंतर्गत मु.शिरगाव ता.मावळ येथील पवना नदीकाठी अवैधरित्या गावठी दारू तयार करून विकत असल्याचे समजलेने त्यानुसार या दारूच्या भट्टीवर पोलिसांनी छापा टाकून १०००००० रुपये किमतीचे १६,००० लिटर कच्चे रसायन , ०.४००रूपये किमतीचे २,००० किलो लाकडी सरपन १२.२०० रूपये किमतीचे होंडा कंगनीचे १ जनरेटर , ३,००० रूपये किमतीचे १ जर्मलची थाळी , ५०० रूपये किमतीचे २ जमलवे चाटू , असा एकूण ८,२३,२०० रूपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्षा जप्त करून ताब्यात घेवून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे श्री . सुधीर हिरेमठ , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे श्री . आर.आर.पाटील , यांचे गार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . विठ्ठल कुबडे , सगोनि / अशोक डोंगरे , सपोफो / विजय काबंळे , पोहवा / सुनिल शिरसाठ , पोना / भगवंता गुले , पोना / नितीन लोंढे , पोना / अनिल गहाजन , गोना / वैष्णवी गावडे , पोना / अमोल शिंदे , पौशि / गणेश करोटे . पोशि /मारुती करबुडे , पोशि योगेश तिडके यांनी केली आहे .

Share this: