क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

गोल्डमॅनच्या मुलानेच केला ‘त्या’ तरूणाचा खून

भोसरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील दिवंगत गोल्डमन दत्ता फुगे यांच्या मुलाच्या कानशिलात लगावली म्हणून त्या तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री दिडच्या दरम्यान भोसरी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ घडली होती.याप्रकरणी गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या मुलासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे .

अमन सुरेश डांगळे ( वय 27 , रा . देवकरवस्ती , चक्रपाणी वसाहत , भोसरी ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शुभम दत्ता फुगे ( वय 26 , रा . भोसरी ) , प्रथमेश वायकर ( वय 19 ) , अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एक अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मयत अमन डांगळे रविवारी रात्री घराबाहेर पडला होता . त्यानंतर तो आरोपी शुभम फुगे याच्या घराच्या टेरेसवर दारू प्यायला बसला . दारू पित असताना मयत अमन आणि आरोपी शुभम यांच्यात वाद झाला . त्यावेळी अमनने शुभमच्या कानशिलात लगावली .

या कारणावरून आरोपींनी आमच्या भाईला का मारले ‘ , असे म्हणून अमन यांना भोसरी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ नेले . तेथे आरोपींनी अमन डांगळे यांच्यावर कोयत्याने वार केले . यात डांगळे यांचा मृत्यू झाला . सोमवारी ( दि . 26 ) सकाळी भोसरी गावात विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ त्याचा मृतदेह आढळला . या गुन्ह्याचा तपास करताना भोसरी पोलिसांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला . सराईत गुन्हेगार शुभम फुगे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार पोलिसांनी शुभम याला ताब्यात घेतले . त्याचा साथीदार प्रथमेश वायकर व अल्पवयीन बालक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे आरोपी शुभम याने पोलिसांना सांगितले . त्यानुसार पोलिसांनी आरोपी वायकर आणि अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेतले . आरोपी शुभम याच्या विरोधात यापूर्वी तीन तर अल्पवयीन बालकाच्या विरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत .पोलिसांनी या आरोपींना अटक केली.

Share this: