क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

प्रकरण मिटवायचे असेल तर एक लाख रुपये दे ;चिखली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

चिखली (वास्तव संघर्ष) : तू गॅसचा बेकायदेशीर धंदा करतो , तुझी व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल करुन , तुझी समाजात बदनामी करु , तुला प्रकरण मिटवायचे असेल एक लाख रुपये दे, असे म्हणुन आरोपींनी चाळीस हजार रुपयांची खंडणी वसूल केली आहे. ही घटना 1 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2021 दरम्यान जैन नाकोडा मेटल्स ” मनिषा सोसायटी साईबाबा मंदीर साने चौक चिखली व अंकुश चौक ओटा स्किम निगडी येथे घडली आहे.

अजय राजेंद्र जैन (वय-31, धंदा – भांडे विक्रीचे दुकान रा . गोकुळ हौसिंग सोसायटी ओ विंग फलॅट नंबर-101 , पाटीलनगर चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संतोष रामा चव्हाण, अक्षय रामा चव्हाण ( रा.बळवंत कॉलनी किराणा दुकाना जवळ चिंचवडेनगर वाल्हेकरवाडी चिंचवड ) सचिन गायकवाड ( पुर्ण नाव पत्ता माहित नाही ) या आरोपी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील तीनही आरोपी यांनी आपआपसात संगनमत करुन आरोपी संतोष याने फिर्यादीस ” गॅसचा बेकायदेशीर धंदा करतो , तुझी व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल करुन , तुझी समाजात बदनामी करु , तुला प्रकरण मिटवयाचे असेल तर एक लाख रुपये रक्कम आम्हाला दे , पैसे दिले नाही तर आम्ही तुझ्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करु , तुला भांडयाचे दुकान चालवुन देणार नाही ‘ अशी धमकी देवुन वांरवार फिर्यादीच्या दुकानात येऊन तसेच फोनवर पैश्याची मागणी फिर्यादी यांचे ” जैन नाकोडा मेटल्स ‘ या दुकानात येवुन वीस हजार रुपये रक्कम व अंकुश चौक ओटा स्किम निगडी पुणे येथुन वीस हजार रुपये रक्कम असे एकुण चाळीस हजार रुपये रक्कम स्विकारुन व फिर्यादीस पुन्हा वीस हजार रुपये रक्कमेची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीतर जिवे ठार मारतो अशी धमकी देवुन खंडणी मागितली आहे. अधिक तपास चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुमटकर करित आहेत.

Share this: