पिंपरी चिंचवड पालिकेच्या खासगीकरण व ठेकेदार विरोधात’ वंचित’चे आंदोलन
पिंपरी(वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड महापालिकेत ठेकेदारी पद्धत वाढली आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनादेखील मलिदा मिळत आहे . त्यामुळे ते ठेकेदारीला विरोध करत नाहीत. ठेकेदारी पद्धत रद्द न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिला. महापालिकेतील ठेकेदारी विरोधात वंचित बहुजन आघाडी शहर व महिला आघाडी वतीने 12 ऑक्टोबर 2021 रोजी शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे ,अनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थित पालिकेच्या खासगीकरण व ठेकेदार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी तायडे बोलत होते. ठेकेदारी पद्धत रद्द झाली पाहिजे . अधिकाऱ्यांवर कारवाई करा, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचारात वाढला गोंधळ , वंचितचे जागरण आदी घोषणा देण्यात आल्या. या वेळी वंचितचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव ‘सर्वजीत बनसोडे ,उपाध्यक्ष – धंनजय कांबळे , कचरु ओव्हाळ, सन्नी गायकवाड शहर प्रवक्ता – के.डी.वाघमारे ,महासचिव राजन नायर,राहुल सोनवणे ,संतोष जोगदंड , कार्यध्यक्ष – माझी नगर सेवक- अंकुश कानडी, सुहास देशमुख , संजिवन कांबळे, माजी युवक अध्यक्ष -गुलाब पानपाटील , कार्यकारणी सदस्य राजु साळवे, ईश्वर कांबळे , प्रविण कांबळे , प्रितम कांबळे,गोरख खळगे, संदिप साळवे, अतुल झोडगे , आकाश डोंगरे, व्यंकटेश कुराडे, सदस्य व सर्व वार्ड अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य व आरोग्य कर्मचारी साफसफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवेंद्र तायडे म्हणाले की , शहरातील महापालिकेचे 9 हॉस्पिटल , दवाखाने ठेकेदारी पद्धतीने चालविण्यात देण्यात आले आहेत .ठेकेदारीने चालणाऱ्या खासगी संस्थांची आयकर विभागाने चौकशी करावी .भाजप व महाविकास आघाडी महापालिकेत भ्रष्टाचार करून जनतेवर अन्याय करत आहे .