राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या सुनेला मारहाण केल्याप्रकरणी बुधवार (दि.13) रोजी मंगला कदम यांच्यासह त्यांचे पती, मुलगा,आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
32 वर्षीय विवाहीत महिलेने याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मंगला अशोक कदम (रा. साईमंगल सोसायटी संभाजीनगर चिंचवड), अशोक कदम, कुशाग्र कदम,गौरव कदम आणि स्वाती कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत फिर्यादी महिला यांचा विवाह कुशाग्र यांच्याशी झाला होता. मात्र 2011 पासून पती कुशाग्र आणि वरील सर्व कुटुंबातील सदस्य पिडीत महिलेला शारिरीक आणि मानसिक छळ करत मारहाण करत होते. तसेच पिडीत महीलेचा पती कुशाग्रला गंभीर आजार असल्याचे लपवून ठेवून पिडीत महीलेची फसवणूक करुन लग्न लावले.माञ ;पीडितेच्या पतीला दुसरा कोणता तरी आजार असल्याचे डॉक्टरांशी संगनमत करून खोटा रिपोर्ट तयार करण्यात आला. इतकंच नाही तर पीडित महिलेला मुल होण्यासाठी आयव्हीएफ पद्धतीची उपचार पद्धत अवलंबण्यात आली. हा सर्व प्रकाराला विरोध केल्याने पिडीत फिर्यादी महीलेला सासरच्या मंडळींनी मारहाण करून शारीरिक आणि मानसिक ञास दिला. हा ञास सहन न झाल्याने पिडीत फिर्यादी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस अधिकारी साळुंखे करित आहेत.