राष्ट्रवादी काँग्रेसचा आगामी निवडणुकीसाठी नवा ‘पॅटर्न’ ;शहराध्यक्ष पदाची माळ यांच्या गळ्यात
पिंपरी (वास्तव संघर्ष) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा नवनिर्वाचित अध्यक्ष कोण होणार यावरून अंतर्गत रस्सीखेच चालू आहे. अनेक चर्चा ही रंगू लागल्यात मात्र राष्र्टवादी महिलांना समान संधी देते आणि महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले हा इतिहास पाहता आगामी पालिका निवडणुकीत महिलांचा हा नवीन पॅटर्न राबवत पिंपरी चिंचवड शहराच्या धर्तीवर मंगला कदम,वैशाली घोडेकर,सुलक्षणा शिलवंत-धर या पैकी कोणाची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात येईल का ? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या धर्तीवर महिलांना फादर बाॅडीचे शहराध्यक्ष पद मिळणार का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या फादर बॉडीवर महिलांचे नेतृत्व माजी आमदार विलास लांडे,अजित गव्हाणे तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पदाधिकारी स्वीकारणार का? पिंपरी-चिंचवड शहरात मंगला कदम,वैशाली घोडेकर यांनी महापौर पदही भूषविले आहे. यांच्या काळात कामकाजही चांगले होते,तसेच पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने झंजावात उभा करण्यात सुलक्षणा शिलवंत-धर याही आघाडीवर आहे. पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे तिकीट आणून त्यांनीही शहरावर आपली ताकद दाखवली आहे, मात्र त्यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आल्याने पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना देण्यात आले. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात सुलक्षणा शीलवंत धर यांनी त्यांची पकड कायम ठेवली आहे. तसेच सध्या शहराध्यक्ष पदासाठी महिला नेतृत्व मध्ये शहरध्यक्ष पद जावे अशी चर्चा जोर धरत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात जर राष्ट्रवादीला जर सत्ता आणायची असेल तर अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मंगला कदम,सुलक्षणा धर(शिलवंत) किंवा वैशाली घोडेकर या शहराचे नेतृत्व उत्तम प्रकारे पार पाडू शकतात.
सध्या पिंपरी चिंचवड शहरात दोन्ही आमदारांच्या विरोधात बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी थोडे मागे पुढे पहातात.पिंपरी-चिंचवड शहरातील अंडी पिल्ले अजितदादांना माहित असले तरी शहरातील नागरिकांना काय हव आहे याकडे मात्र अजितदादां पवार यांचे दुर्लक्ष आहे असे दिसून येते कदम,घोडेकर आणि धर या भाजपचा दोन्ही आमदार विरोधात पक्षाची भूमिका उत्तम प्रकारे बजावु शकतात. त्या डॅशिंग असल्याने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये फादर बाॅडी ताकतवर बनेल.
दरम्यान, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी ‘लॉबिंग’ सुरू केले आहे. आपल्या समर्थकांमार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न हे इच्छुक करताना दिसत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शहरातील पदाधिकाऱ्यांशी स्वतः संपर्क ठेऊन चाचपणी सुरू केली जात आहे. त्यामुळे महिला शहराध्यक्षा म्हणून मंगला कदम,सुलक्षणा धर(शिलवंत) किंवा वैशाली घोडेकर यांना संधी मिळाल्यास आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन येतील.