पिंपरीपर्यंत प्रवास करत शरद पवार यांनी केली मेट्रोची पाहणी
पिंपरी(वास्तव संघर्ष) :पुणेकरांची बहुप्रतिक्षित मेट्रो आता लवकरच सुरू होणार आहे. पुण्यातील गरवारे या मेट्रो स्टेशनचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून, लवकरच पुणेकरांचा मेट्रोने प्रवास सुरु होणार आहे. पुणेकरांना मेट्रोमध्ये प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या काही वर्षापासून पुण्यातील मेट्रोचे काम सुरू होते आता मात्र दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज (दि.17) सकाळी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेच्या कामाची माहिती घेतली. कामाच्या पुढचा टप्प्याबाबतचीही माहिती घेतली. फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत त्यांनी मेट्रोनेही प्रवास केला.
यावेळी मेट्रोचे ब्रीजेश दिक्षीत, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार विलास लांडे, प्रवक्ते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, शहर सरचिटणीस फजल शेख आदी उपस्थित होते.
स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची संपूर्ण माहिती पवार यांनी घेतली. डेमोही घेतला. मेट्रोने फुगेवाडीपासून पिंपरीपर्यंत प्रवास केला. पुढल्या टप्प्यांबाबतही पवार यांनी मेट्रोच्या अधिका-यांकडून माहिती घेतली.