क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

‘इन्स्टाग्राम ‘ वरील भाईगिरीचे व्हिडिओ पडले महागात ; ‘थेरगाव क्वीन’ अखेर गजाआड

पिंपरी(वास्तव संघर्ष) : कुठला डॉन आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील 302 ”अशी भाईगिरीची भाषा करुन सोशलमिडीयावर हवा करणा-या तसेच अश्लील शिवीगाळ देऊन बिनधास्त इंश्टाग्राम(INSTAGRAM) या सोशल मीडियावर धमकी देणारी ‘थेरगाव क्वीन’ ला आज वाकड पोलीसांनी अटक केली आली आहे.तिचे इंस्टाग्राम अकाउंट देखील बॅन करण्यात आले आहे.

पोलिस उपनिरीक्षक संगिता गोडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार थेरगाव क्वीन नावाने अकाउंट चालवणारी साक्षी हेमंत श्रीश्रीमल (रा. थेरगाव), कुणाल कांबळे (रा. गणेशपेठ पुणे), साक्षी राकेश कश्यप (रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी चिंचवड मधील थेरगाव येथे राहणारी आरोपी साक्षी ही तीच्या साथीदारांसोबत आरोपी कुणाल आणि आरोपी साक्षी कश्यप मिळून सोशलमिडीयावरील ईश्टाग्राम (Instagram) वर रिल बनवून अश्लील शिवीगाळ करीत होते. सोशल मीडियावर ‘थेरगाव क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असणारी रिलस्टार साक्षी श्रीश्रीमल ही वादग्रस्त आणि अश्लील भाषा तसेच मुलींना बलात्काराच्या धमक्या देणारे तिचे व्हिडीओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. व्हिडीओज मधून तिने अनेकदा समोरच्याला धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर तिला आणि तिच्या साथीदारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास वाकड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव करीत आहेत.

Share this: