प्रियांका उमरगेकर आत्महत्या प्रकरणी नगराध्यक्षासह कुटुंबाला अटक
आळंदी(वास्तव संघर्ष) : आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर त्यांचे पती व मुलाला सुनेच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आली आहे.मृत प्रियांका यांनी सासरच्या जाचाला कंटाळून रविवारी (दि.10) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आत्महत्या केली होती.
याप्रकरणी प्रियांका यांचे वडील अनिल घोलप ( वय 45, रा. प्राधीकरण निगडी ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
त्यानुसार सासरे अशोक भगवान उमरगेकर(कांबळे)( वय 60 ), पती अभिषेक अशोक उमरगेकर(कांबळे),( वय 27 ), तसेच माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर त्यांचे पती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , प्रियांका यांचे आठ महिन्यांपूर्वी अभिषेक यांच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या मुलीचा राहिलेला हुंडा म्हणजेच संसारोपयोगी साहित्य व फर्निचर आणणार याबाबत तिचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली होती. या ञासाला कंटाळून प्रियांका यांनी आत्महत्या केली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील करित आहेत.