बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पालिकेच्या निवडणूकीसाठी होणार चारचा प्रभाग

पिंपरी (वास्तव संघर्ष): राज्यातील शिंदे सरकार नव्याने प्रभाग रचना तयार करणार आहे.प्रभाग रचना तयार करण्याचे नगर विकास विभागाने आदेशही जारी केले आहेत. त्यामुळेच येणाऱ्या पिंपरी चिंचवड पालिकेची निवडणूक ही चार प्रभाग रचनेनुसार घेतले जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा झटका शिंदे सरकारने दिला आहे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातच नवी मुंबई, औरंगाबादच्या निवडणूक दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून, तर मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड अशा काही महत्त्वाच्या महानगरपालिकेची निवडणूक ही फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. यातच अनेक ठिकाणी प्रशासक हे पालिकेचे कामकाज सांभाळत आहेत. या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टातही केस सुरु आहे. त्याचवेळी शिंदे सरकारचा हा आदेश समोर आला आहे.

राज्यातील महापालिका निवडणुका घेण्यासाठी शिंदे सरकारने तयारी सुरु केली आहे. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या परवाच्या आदेशात स्थिती जशी आहे, तशी राहूद्या, असं सांगण्यात आलं आहे. याच्या आधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खडसावलं होतं की, शक्य असल्यास पावसाळ्यात निवडणूक घ्या. त्यावेळी जी प्रक्रिया होती, ती जवळपास पूर्ण झाली आहे. यातच जर सध्याच्या सरकराने आधीची प्रक्रिया मान्य केली, तर दोन आठवड्यातही निवडणूक होऊ शकते.

मात्र शिंदे सरकारला महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभागाची सगळी नव्याने रचना करायची असेल त्यात अधिकचा कालावधी लागु शकतो. यामध्ये सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी चार ते पाच महिन्याचा कालावधी लागू शकतो. यामुळे आजच्या आदेशानंतर पालिका निवडणुकीसंदर्भात सरकराचा काय हेतू आहे, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

दरम्यान, 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच पिंपरी चिंचवड पालिकेची निवडणूक होईल हे आता स्पष्ट झाले असून 32 प्रभाग राहतील.केवळ नव्याने आरक्षण सोडत काढावी लागू शकते.सध्याच्या आरक्षणात मोठा बदल होऊ शकतो. याआधी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने तीनसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्याचा आदेश देऊन नगरसेवकांची संख्या 128 वरुन 139 वर नेली होती तीनसदस्यीय पद्धतीनुसार 46 प्रभाग असणार होते139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी होती.सर्वसाधारण वर्गासाठी 77, ओबीसीसाठी 37,अनुसूचित जमाती (एसटी) साठी 3 तर अनुसूचित जाती (एससी ) साठी 22 जागा राखीव होत्या.मात्र आता 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच पिंपरी चिंचवड पालिकेची निवडणूक होईल ती चार सदस्य पध्दतीने होऊन नगरसेवक संख्या 128 होऊ शकतेशकते. नगरविकास विभागाने याबाबत आयुक्तांना आदेश पाठविला आहे.

Share this: