मनोज गरबडे आणि साथीदारांवरील 307 कलम मागे, तर 11 पोलिसांचे निलंबन सुद्धा रद्द
मुंबई(वास्तव संघर्ष) :पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी (दि.10) चिंचवड येथे झालेल्या शाई फेक प्रकरणात आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हत्वपूर्ण आदेश दिले आहेत. शाईफेक करणारा मनोज गरबडे आणि त्याचे दोन साथीदार यांच्यावर लावण्यात आलेले कलम 307हा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मागे घेण्याचे तसेच या प्रकरणात 11 पोलिसांचे केलेले निलंबन रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
गरबडे आणि पोलिसांवरील तडकाफडकी कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. स्वतः चंद्रकांत पाटील यांनीही गुन्हा मागे घेण्याबाबत तसेच पोलिसांचे निलंबन रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज मुंबईत झालेल्या बैठकीत गरबडे यांच्यावर लावण्यात आलेले कलम 307 हा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मागे घेण्याचे तसेच 11 पोलिसांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.