क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक:पिंपरीत अंधश्रद्धेच्या नावावर सहा डुकरांची कत्तल

File Photo

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरीमध्ये अंधश्रद्धेच्या नावावर सहा डुकरांची कत्तल करून त्यांना जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना एच. ए. ग्राऊंड या मैदानात शुक्रवारी (दि.17) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.

अॕड. प्रज्वल कमलेश दुबे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे.

त्यानुसार सुनिल गजरे (वय 23), बबन गजरे (वय 19) रामदास गजरे (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रज्वल हे कामानिमित्त जात असताना त्यांना काही जण गाडीमधून डुकरांना खाली उतरवताना दिसले. संशय आल्याने फिर्यादी प्रज्वल यांनी त्वरीत पिंपरी चिंचवड पालिका पशुवैद्यकीय विभागाला फोन केला. ‘अशी’ घटना घडत असून असा काही परवाना महापालिकेने दिला आहे का? याची विचारणा केली. यावेळी त्वरीत महापालिकेने आरोग्य निरीक्षकाला तेथे पाठवले.फिर्यादी प्रज्वल या दरम्यान काही प्राणी मित्रांना तेथे बोलावले. जवळ जाताना त्यांना एक जिवंत डुक्कर दिसले पुढे काही अंतरावर सहा डुकारांना जाळून टाकण्यात आल्याचे दृश्य दिसले. यानंतर पोलिसांना संपर्क साधत याबाबत रितसर तक्रार देण्यात आली. तेथील दृश्य पाहता अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: