पिंपरी-चिंचवड पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाच घेताना लिपीकाला अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (मंगळवारी) दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकला. लिपिकाला पोलिसांनी अटक केली आहे. या लिपीकडे 1 लाखाहून अधिक रोकड सापडल्याचे सांगितले जात आहे.
लिपिकाने एका ठेकेदाराकडे पैशाची मागणी केली होती. ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार पाणीपुरवठा विभागात आज दुपारी एसीबीच्या पथकाने छापा टाकला. एका लिपिकाला ताब्यात घेतले असून अटकेची कार्यवाही सुरू आहे.
महापालिकेतील तिस-या मजल्यावर प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांची स्थायी समितीची सभा सुरु झाली होती. त्याचवेळी एसीबीने छापा टाकली. स्थायी समितीच्या बैठकीत बसलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिका-याला बैठकीतून बोलावून घेतले. बंद दाराआड चौकशी केली.