क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मुलाला आणि भाच्याला बापानेच करायला सांगितले असे काम;वाचून तुम्हाला बसेल धक्का

पिंपरी (वास्तव संघर्ष): बाप हा नेहमीच आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी सांगून सरळ आणि चांगल्या मार्गावर जाण्यासाठी धडपड करत असतो. त्या मुलांना चांगले शिक्षणाप्रमाणेच चांगले संस्कार देखील देत असतो. मात्र याच गोष्टीला हरताळ फासण्याचे काम एका बापाने केले आहे.त्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलाला व भाच्याला अट्टल गुन्हेगार बनवण्यासाठी मोबाईल चोरी शिकवली व त्यांना हिंजवडी, वाकड परिसरात मोबाईल चोरी करायला भाग पाडले. पोलिसांनी आरोपींना शुक्रवारी (दि.24) रोजी अटक केली आहे.

सुरेश दगडू जगताप (वय 38 रा. कुसगाव, मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथक हिंजवडी- वाकड परिसरात गस्त घालत असताना आरोपीला पोलिसांनी वाकड स्माशान भूमी येथून अटक केली आहे, त्याला ताब्यात घेताच पोलिसांनी त्याच्याकडून पासष्ट हजार किंमतीचे 8 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.पोलीस तपासात आरोपीने सांगितले की, तो या चोरीसाठी त्याचा अल्पवयीन मुलगा व भाचा यांच्याकरवी चोरी करत होता. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी एकूण 65 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत.

हि कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, किरण काटकर विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गणेश गिरीगोसावी, सुधीर डोळस. प्रदिप गायकवाड, प्रदिप गुट्टे यांनी केली.

Share this: