बातम्या

भीमाकोरेगाव दंगल प्रकाश आंबेडकरांनी भडकवली -खा.अमर साबळे

भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सदन येथे झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत खासदार अमर साबळे यांनी हा आरोप केला आहे. 

नवी दिल्ली :  येथे नुकत्याच झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत कोरेगाव भीमा येथे गेल्यावर्षी उसळलेल्या जातीय हिंसाचारामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सदन येथे झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेना युतीपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाजप खासदारांनी आपली कैफियत भाजप अध्यक्ष अमित शहासमोर मांडली.

यावेळी खासदार अमर साबळे यांनी कोरेगाव भीमा जातीय हिंसाचाराचा मुद्दा अमित शाह यांच्यासमोर उपस्थित केला. भारीप अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दंगल भडकवण्यास मदत केल्याचेही ते यावेळी म्हणाले.या वादग्रस्त विधानांमुळे अमर साबळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Share this: