व्हीडिओ :नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच मंञ्याने केला महिलेला अश्लिल स्पर्श
वास्तव संघर्ष आॅनलाईन :- प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या समोरच ञिपुरा भाजप सरकार मधील मंञी मनोज कांती देव यांनी महिला मंत्र्याबरोबर अश्लील चाळे करत असभ्य वर्तन केल्याचे समोर आले आहे.
सदरील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात वायरल झाला आहे. ञिपुरा मध्ये भाजप सरकार आहे आगरतळा येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर असताना मनोज कांती देव यांनी त्यांच्या पुढे उभ्या असलेल्या संताना चाकमा यांच्या कमरेवर हात ठेवला. सदरील व्हिडीओ जाकीर अहमद यांनी आपल्या ट्विटर अकाउंट व्हिडीओ अपलोड केला आहे.
मंञी मनोज देव यांनी अत्यंत चाकमा या महिला मंञ्याला स्पर्श केला. मनोज देव यांचा इरादा लक्षात येताच संताना चाकमा यांनी लगेच मनोज कांती देव यांचा हात दूर केला. संताना चाकमा या त्रिपुरा सरकारमध्ये सामाजिक कल्याण आणि शिक्षण मंत्री आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या भाषणात नेहमीच महिलांचा सन्मान मिळाला पाहिजे. त्या सक्षम झाल्या पाहिजेत असे सांगत असतात.
आता चक्क मोदींसमोरच त्यांच्याच पक्षाच्या सरकारमधील मंत्र्याने असे वर्तन केले. शनिवारी ९ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात ही घटना घडली. त्रिपुरात विरोधी पक्षात असलेल्या डाव्यांनी मनोज कांती देव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री मंचावर असताना मनोज कांती देव यांनी महिला मंत्र्याबरोबर केलेले वर्तन अत्यंत चुकीचे आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे असे डाव्या आघाडीचे संयोजक बीजान धार यांनी सांगितले. संताना चाकमा या त्रिपुरा सरकारमधील एकमेव महिला मंत्री आहेत.
दरम्यान भाजप मंत्र्याविरोधात जाणुन बुजून नको त्या विषयावरुन राजकारण केले जात आहे.जर त्या महिला मंत्र्याची तक्रार नसेल तर तुम्हाला काय अडचण आहे असे मत भाजप प्रवक्ते नाबेंदू भट्टाचार्य यांनी आपले मत व्यक्त केले
Minister ka nam hai #manojkantidev https://t.co/b7jSVT7TbV
— Zakaria Ahmed (@zakariaahmed332) February 10, 2019