बातम्यामहाराष्ट्र

‘बाळा राहुल हे हिंदुस्तान आहे, इथे नामर्दाला जागा नाही, उद्धव ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका

बुलढाणा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांना लाज, लज्जा शरम काहीच राहिली नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली. तर राहुल गांधींवर टीका करताना ‘बाळा राहुल हे हिंदुस्तान आहे, इथे नामर्दाला जागा नाही’ अशी कठोर टीकाही त्यांनी यावेळी केली.

बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी खामगाव येथे सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
काश्मीरमध्ये ३७० आम्ही काढणार नाही असं म्हणत आहेत. या देशातून देशद्रोहचा कलम काढून टाका असं काही लोकांचं म्हणणं आहे. शरद पवारांना काही लाज, लज्जा शरम राहिलीच नाही, त्यामुळं मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांना विचारतोय तुम्हाला हे चालेल का, असं ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. उद्या दाऊद काँग्रेसमध्ये आला तर त्याला काँग्रेसवाले दाऊदजी म्हणतील. ‘बाळा राहुल हे हिंदुस्तान आहे, इथे नामर्दांना जागा नाही, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

भाजपचं नातं खट्टंमीठं होतं, त्यामुळे मधे थोडं काम कमी झालं असेल, पण आता युती झाली आहे, त्यामुळं तुम्हाला सगळं गोड मिळेल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Share this: