क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्र

मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर पुण्यात हल्ला

सासवड (वास्तव संघर्ष ) – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर पुण्यातील सासवडमधील पंडित मोडक यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे . पंडित मोडकांची गोशाळा आहे. ते गाड्या पकडतात, भ्रष्टाचार करतात त्यामुळे आमचे जुने वाद असल्याचे एकबोटेंनी फेसबुकवर आधी लिहीलं होतं. या वादातूनच ही घटना घडली आहे.  मोडक यांच्या चिथावणीवरुन त्यांच्या कार्यकत्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जाते. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री साडे नऊच्या सुमारास सासवड येथील झेंडेवाडीमध्ये घडली.

याप्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सासवड येथील झेंडेवाडीमध्ये मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हरिनाम सप्ताह निमित्त मिलिंद एकबोटे हे आले होते. “पंडित मोडका गोशाळा चालवितो आणि तोच गाड्या पकडतो, भ्रष्टाचार करतो”, अशा स्वरूपाची पोस्ट एकबोटेंनी फेसबुकवर लिहिली होती. या रागातून मोडक आणि त्यांच्या ४० ते ४५ समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला. मोडक यांच्या समर्थकांनी एकबोटे आणि त्यांच्या कार्यकत्यांना लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this: