बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

राजमाता अहिल्यादेवीचा सत्ताधारी भाजपला विसर ;जयंतीत भष्ट्राचार होतो म्हणणारे नेते गेले कुठे?

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :-  राजमाता आहिल्यादेवी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं शिवसेना सलग्न शिवशाही व्यापारीसंघ व राष्ट्रीय समाज पक्ष पिंंपरी चिंचवड शहराच्या वतीने राजमाता आहिल्यादेवी यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मोरवाडी चौक या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व राष्ट्रीय समाज पक्ष शहराध्यक्ष भरत महानौर यांनी पिंंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा पुण्यतिथी साजरी न केल्याने निषेध केला.

यावेळी युवराज दाखले म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी जयंतीनिमित्त भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये एकमत नव्हते कारण जयंतीत होणारा भष्ट्राचार हा मुद्दा होता, माञ राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती धुमधडाक्यात करणा-या पालिकेला पुण्यतिथीचा विसर का पडला? जयंतीत भष्ट्राचार होतो म्हणणारे नेते गेले कुठे? पुण्यतिथीत खर्च करता येत नाही म्हणून विसर का? असे खडे सवालही दाखले यांनी उपस्थित केले .

या प्रसंगी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सतिष भवाळ, शिवशाही व्यापारीसंघ चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेश पाडुळे, बाळु कदम, शिवशाही वाहतुक आघाडीप्रदेश अध्यक्ष विनोद खांडेकर, दत्ता गिरी, विनोद जाधव, आशिष वाळके आदी पदाधिकारी उपस्थित होते

Share this: