राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवारांनी घेतली बाळासाहेब आंबेडकर यांची भेट ; उमेदवारांना वंचितचा पाठिंबा मिळण्याची शक्यता?
दिपक साबळे…! पिंपरी(वास्तव संघर्ष)विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मदत मिळावी यासाठी भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे व चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आज सांयकाळी ५ वाजता पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी हाॅटेलमध्ये वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आंबेडकर आले असता वंचित आघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांची बैठक पिंपरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेण्यात आली.या बैठकीस राज्यातील वंचित आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.दोन तास चाललेल्या बैठकीनंतर विलास लांडे व राहुल कलाटे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली.बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत समजू शकले नाही.
सुञाकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंचवड येथील वंचीत उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने चिंचवडमध्ये वंचीतचा राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्यासाठी आंबेडकर यांची मनधरणी करण्यात आली होती माञ भोसरीतील उमेदवार असून त्याबद्दल चर्चा झाली नाही. झालेल्या बैठकीत कोणता निर्णय झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहूल कलाटे आणि विलास लांडे यांना वंचीत बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्यास चिंचवड विधानसभा आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो.