क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भाजप नेते बबलू सोनकर, राष्ट्रवादी नगरसेवक डब्बू आसवानी यांची येरवडा तुरुंगात रवानगी

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील भाजप नेते बबलू सोनकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी यांना आज मोरवाडी कोर्टाने येरवडा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती माञ तीन दिवसांच्या पोलीस रिमांड नंतर त्यांना मोरवाडी कोर्टात हजर करण्यात आले होते.

यावेळी दोन्ही पक्षांच्या वकीलांनी आपल्या अशीलांची बाजू मांडली पोलीस रिमांड तोडण्यात वकील जरी यशस्वी झाले असले तरी येरवडा कारागृहात सोनकर आणि आसवाणी यांना पाठवण्याचे आदेश आज अखेर मुजावर कोर्टाने पोलिसांना दिले.

भाजप नेते बबलू सोनकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच 307 हा गंभीर गुन्हा देखील त्यांच्यावर असून त्यांना जर जामीन करायचा असेल तर ते पुणे न्यायालयात किंवा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात.

दरम्यान ऐन मतदानाच्या दिवशी बबलू सोनकर आणि डब्बू आसवानी समोरासमोर भिडले होते यामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख अनिल पारचा यांना गंभीर दुखापत झाली होती.

Share this: