जावेद हबीब यांनी केले केसांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन
वंडरसॉफ्ट तर्फे केसांच्या आरोग्याविषयी कार्यशाळा
पुणे(वास्तव संघर्ष) : बदलत्या जीवनशैलीबरोबरच सौंदर्य सेवांची मागणीही अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे जास्तीत तरुण तरुणींनी या क्षेत्रात येऊन करिअर करावे, असे आवाहन प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी केले.
टिळक रस्त्यावरील रंगदर्शन हॉल येथे वंडरसॉफ्ट कंपनीच्या वतीने ब्युटीशीयन महिलांसाठी केसांचा रंग आणि केसांची निगा राखण्याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाशेहून अधिक महिला ब्युटीशीयनला जावेद हबीब यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्रातील सौंदर्यप्रसाधक (ब्युटीशीयन) आणि सलून सहभागींविषयी माहिती दिली. या प्रसंगी कंपनीचे उपाध्यक्ष अरेन्द्र शर्मा, कंपनीचे झोनल मॅनेजर मोहनकुमार उपस्थित होते.
अरेन्द्र शर्मा यांनी सर्व सहभागींना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले. यावेळी मोहनकुमार म्हणाले, की आम्ही लोकांना जी उत्पादने देत आहोत, ती चांगल्या प्रतीची आणि कमी किंमतीत उपलब्ध आहेत. जेणेकरून सामान्य लोकदेखील आपल्या केसांची काळजी घेऊ शकतील.